मत्स्य व्यवसायातील पाटील बंधूंची ७५ वर्षांची परंपरा
एन पी
फिश कंपनी पश्चिम महाराष्ट्राची नंबर एकची पसंती
यश कोणालाही सहजासहजी मिळत
नाही. यासाठी खूप कष्ट करावे लागतात. आणि योग्य धोरण अवलंबावे लागते जे आपणास
यशाच्या फळाकडे घेउन जाण्यास मदत करते. "कष्ट केल्यास कर्म तुम्हाला नक्कीच योग्य मोबदला देते." या विचारा प्रमाणे
कोळेवाडी,ता. कराड येथील पाटील बंधूंचा मत्स्य व्यवसायातील प्रवास गेली ७५ वर्षापासून अव्याहतपणे सुरु आहे.
एन पी फिश कंपनीचा प्रवास-
पाटील बंधूंच्या एन पी फिश कंपनीचा ७५ वर्षाचा प्रवास मुंबई येथून सुरु झाला. कराड तालुक्यातील कोळेवाडी गावातील महादेव सदोजी पाटील (आण्णा) यांनी मुंबई येथे मत्स्य व्यवसायाची सुरवात केली. पूर्वीच्या काळी शेती हाच पारंपारीक व्यवसाय होता. शेतीतून पुरेसे अर्थार्जन होत नसे. त्यामुळे आण्णांचे वय 16 असतानाच त्यांनी थेट मुंबई गाठली. मुंबई मध्ये मामांच्या मदतीने त्यांनी मंच्छी मार्केटमध्ये छोटीशी नोकरी करण्यास सुरवात केली. नोकरी बरोबर आण्णांनी पडेल ते काम करण्याचे स्विकारले. नोकरी बरोवर आपलाही एक छोटासा व्यवसाय असावा या विचारातून आण्णांनी हळूहळू स्वताचा मच्छी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. एम.एस.पी. या नावाने त्यांनी कंपनी सुरु केली. या रोपट्याचे श्री. काशिनाथ महादेव पाटील (भाऊ) यांनी वटवृक्षात रुपांतर केले. मत्स्य व्यवसायाचा व्याप वाढवत असताना मुंबई मधील प्राप्त परस्थिती हालाकीची व संघर्षाची होती. आजोबा महादेव सदोजी पाटील (आण्णा) वृध्दापकाळात गावाकडे आल्यानंतर वडिल श्री. काशिनाथ महादेव पाटील (भाऊ) यांच्यावर व्यवसायाची जबाबदारी पडली. मुलं लहान असताना घर व व्यवसाय सांभाळण्याची कसरत आण्णांना करावी लागली. आजोबा महादेव सदोजी पाटील (आण्णा) यानी सुरु केलेला मत्स्य व्यवसाय व वडिल श्री. काशिनाथ महादेव पाटील (भाऊ) यांनी वाढवला. अजित काशिनाथ पाटील व सुनिल काशिनाथ पाटील यांनी व्यवसायाचे धोरणात्मक मॉडेलमध्ये रुपांतर करण्यास सुरवात केली. त्यातूनच कराड येथे न्यू पाटील फिश कंपनी म्हणजेच एन पी फिश कंपनीची स्थापना झाली. त्याचबरोबर एन पी फिश फँमिली रेस्टाँरंट, एन पी फिश मसाले व फ्राय काउंटर (आउटलेट) आदी प्रकारचे सह व्यवसायही पाटील बंधूंनी सुरु केले आहेत.
कंपनीचा शाखा विस्तार
कराड, इस्लामपूर, विटा, पलुस, सातारा,वारणा-कोडोल
, सांगली, सांगोला, उचगांव- कोल्हापूर, रंकाळा कोल्हापूर सैदापुर कराड आदी ठिकाणी शाखा विस्तार असून पुढील
प्रस्तावीत शाखांचे कामकाज सुरु आहे.
प्रसातावित शाखा विस्तार -
पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका व शहराच्या ठिकाणी
एन पी फिश कंपनीचा शाखा विस्तार करण्याचा कंपनाचा मानस आहे. प्रत्येक शाखेत व
शाखेतून ग्राहकापर्यंत ताजे (फ्रेश) मासे पोहचवण्याचे नियोजन.
कराड येथील एन पी फिश कंपनीमध्ये मासे येणा-या बंदरांची
नावे-
कराड येथील एन पी फिश कंपनीमध्ये सिंधुदुर्ग, मालवन, रत्नागिरी,श्रीवर्धन,
हरणे बंदर, अलिबाग येथील बंदरातून माशे येतात.
कंपनीमध्ये मासे आनन्यासाठी आवश्यक सुविधा-
हवाबंद व अत्याधुनिक सुविधा
असलेल्या 20 गाड्यातून मासे आनले जातात. बंदराच्या ठिकाणी मासे गाडीमध्ये
भरल्यानंतर तीन ते चार तासात मासे कराड येथील मुंख्य गोडाऊनला पोहचतात. या ठिकाणी
सुसज्ज असे कोल्ड रुम आहे. या कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून लोकांना दररोज ताजे
मासे खायला मिळतात. इतर ठिकाणच्या शाखांना थेट बंदरावरुन तर कधी कराड येथील कोल्ड
स्टोरेजमधून मासे पुरवले जातात.
अध्यावत सुविधांचा समावेश-
सुसज्ज कोल्ड रुम, सुसज्ज व अत्याधूनिक सुविधा प्राप्त असलेली वाहतूक यंत्रणा, सुसज्ज स्टोअर, मासे साफ करण्याची स्वतंत्र सोय, स्वच्छ व सुबक व पारदर्शक ट्रे मधून मासे खरेदीची सोय, कुशल व तज्ञ कामकार वर्ग.
कंपनीच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती-
मत्स्य
व हाँटेल व्यवसायाच्या प्रत्येक तालुक्याच्या व
शहराच्या ठिकाठी आम्ही शाखा (फ्रान्चायझी) देत आहोत. मत्स्य व हाँटेल
व्यवसायातून सुमारे 300 लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे.
श्री.मुंबादेवीचे
मंदिर
आपली व्यवसायाप्रती
असणारी श्रध्दा व मुंबई या कर्मभूमीने दिलेला आशिर्वाद व साथ या भावनेतून महादेव सदोजी पाटील (आण्णा) यांनी 1980 ला कोळेवाडी
येथे सुंदर असे श्री.मुंबादेवीचे मंदिर बांधले. काही दिवसानंतर पाटील बंधूंनी या
मंदिराचे नुतनीकरण केले. मंदिरात दररोज पूजा आर्चा केली जाते. प्रत्येक वर्षी
यात्रेनिमित्त मोठा धार्मिक कार्यक्रमही आयोजित केला जातो.
आजोबांनी लावलेल्या
रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर.
मुंबई
ते पश्चिम महाराष्ट्र असा तीन पिढ्यांचा मत्स्य व्यवसाययातील प्रवास. जिद्द व
चिकाटीच्या जोरावर मुंबई स्थित व्यवसाय पश्चिम महाराष्ट्रात नावारुपाला आला, ही एक
आदर्श बाब आहे. आज एन पी फिश कंपनी पश्चिम महाराष्ट्राची नंबर एकची पसंती बनली
आहे.



